जाणून घ्या हे आहेत जिब्रेलिन( Gibberellin) वनस्पती संप्रेरकाचे कार्ये

     ''  जाणून घ्या हे आहेत जिब्रेलिन( Gibberellin) वनस्पती संप्रेरकाचे कार्ये''


.

    - जिब्रेलिन हे वनस्पतीमधिल एक महत्त्वपूर्ण संप्रेरक असून त्याचे भरपूर फायदे झाडांना ( पिकांना) होतात.

  -  सर्वात प्रथम जिब्रेलिन हे जिब्रेला फुसिकोराय या कवक मध्ये सापडले. हे कवक भात पिकात फुलिश सिडलिंग       नावाच्या रोगाला कारणीभूत असते. जिब्रेलिन मध्ये जिब्रेलिक आम्ल असते. 

 जिब्रेलिन चि काही महत्त्वाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत...

1. वनस्पती पेशींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.

2. जर झाडात डाॅर्मिन या संप्रेरक चे प्रमाण वाढून नवीन येणारी वाढ थांबली तर जिब्रेलिन डाॅर्मिनचि कार्यक्षमता कमी करून ती वाढ पूर्ववत चालू करते.

3. फळांची वाढ होण्यासाठी जिब्रेलिन चि आवश्यकता असते.

4. पीक फुलोरा किंवा फुलोरा येण्यासाठी जिब्रेलिन महत्त्वाचे काम करते.

5. बीज अंकुरण या क्रियेत बिया मधील साठलेल्या अन्नाचे विघटन करण्यासाठी अमायलेज आणि इतर विकारांची निर्मिती करून भ्रूण वाढ नियंत्रित करून अंकुरणास  मदत करते.

5. वनस्पतीत साठवलेली प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि शर्करा यांचे रूपांतर सुक्रोज आणि इतर वाहत्या अमांनो आम्ल यामध्ये करून ते पूर्ण झाडात पोहोचण्यासाठी जिब्रेलिन मदत करते. यामुळे झाडात साठवलेले अन्न एकाच ठिकाणी न राहता ते दुसर्‍या रुपात रुपांतरीत होऊन पूर्ण झाडा पर्यन्त पोहोचते.

6. बियाण्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन उपयुक्त आहे. 

7. झाडाच्या पानांचा आकार वाढण्यात जिब्रेलिन महत्त्वाचे काम करते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण होण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते आणि त्यामुळेच झाडाची वाढ चांगली होते.

8. जिब्रेलिन खोडाची लांबी वाढवते त्यामुळे झाडांची उंची वाढते. 

10. दोन नोडमधील अंतर वाढवण्यासाठी जिब्रेलिन उपयोगी असून त्यामुळे ऊसामध्ये कांडी लांब होते. 

11. फळांचे आकारमान वाढवते. 

12. फुलगळ व फळगळ थांबवते. 

13. नर आणि मादी फुलांचे प्रमाण सारखे ठेवते.

14. परागकण अंकुरण नियंत्रित करते. 

   कोणतेही संप्रेरक हे कमीत कमी प्रमाणातच परिणामकारक असते. त्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांना इजा होऊ शकते त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली च संप्रेरके फवारणी करावी.

हे सुध्दा वाचा

मातिचा नमुना गोळा करण्याची शास्त्रीय पद्धत

https://krishiratna.blogspot.com/2021/02/blog-post.html

शेतकरी बंधूंनो लेख कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून कळवा व अशीच शेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी कृषिरत्न ब्लॉग ला फाॅलो करा व कृषिरत्न युट्यूब चॅनल पुढील लिंकवर जाऊन सबस्क्राईब करा https://www.youtube.com/c/Krishiratna

धन्यवाद.🙏🏻😊

डॉ. सुवर्णा अनंत इंगळे 

Ph. D. Plant Physiology 

MPKV, RAHURI

1/Post a Comment/Comments

Post a Comment