असे करतात ग्रीनहाऊस शिवाय विष्णू भाऊ गडाख विदेशी भाजीपाला शेती









 बुलढाणा शहराजवळ असलेल्या येळगाव येथील पदवीधर शेतकरी यांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.

     या जगात खूप समस्या आहे पण आपण जर उपाय शोधला तर सर्व   समस्यांवर मार्ग निघू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे येळगाव येथील पदवीधर शेतकरी विष्णू श्रीराम गडाख जळगाव येथे असलेल्या स्वर्गीय मुंडे सरकार जलाशयात त्यांची वडिलोपार्जित जमीन गेली त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी जमीन जमीन शिल्लक राहीली यामुळे या शेतात पारंपरिक पिकांची लागवड करून संसार करता येणार नाही हे त्यांना कळून चुकले त्यामुळे ते सतत काही ना काही करून आपल्या कुटुंबाची गरज भागवत होते विष्णू गडाख उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. अशा या उपक्रमशील शेतकऱ्यांना २०१५ मध्ये यूट्यूब च्या माध्यमातून विदेशी भाजीपाल्याची माहिती मिळाली व त्यांनी ठरवले की आपणही या विदेशी भाजीपाल्याची शेती ती करायची. युट्युब वरील माहितीनेच  त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.







   सुरुवातीला आलेल्या अडचणी


१) मे- जूनमध्ये लागवड केली त्यामुळे उत्पादन मिळाले नाही 


ग्रीनहाऊसमध्ये विदेशी भाजीपाला बाराही महिने आपण घेऊ शकतो पण विष्णू गडाख यांच्याकडे ग्रीनहाऊस नसल्याने त्यांनी मे-जून महिन्यात केलीली लागवड यशस्वी होऊ शकली नाही या अनुभवातून धडा घेत त्यांना कळले की ग्रीनहाऊस नसल्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळ विदेशी भाजीपाला लागवडीसाठी सर्वात योग्य आहे.








 २) सुरुवातीस ग्राहकांची नापसंती 


बुलढाणा या छोट्याशा शहरात बऱ्याच ग्राहकांना या विदेशी भाजीपाल्याबद्दल माहिती नसल्यामुळे ग्राहक भाज्या घेत नसे त्यामुळे निराश न होता इच्छा तिथे मार्ग या म्हणीची प्रचिती देत त्यांनी मार्ग काढला त्यांनी या भाजीपाल्याची माहिती पत्रके तयार केली भाजी बनविण्याची प्रक्रिया,या भाज्या खाल्ल्यामुळे होणारे आरोग्याचे फायदे अशा प्रकारची परिपूर्ण माहिती असणारी माहिती पत्रके ग्राहकांना वाटली याचाच परिणाम म्हणजे ग्राहकांना या विदेशी भाषेचे महत्त्व पटले व भाज्यांची मागणी वाढली.


 विष्णू भाऊ असे करतात विदेशी भाजीपाल्याचे नियोजन 


मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चाइनीस वांगी, चेरी टोमॅटो, बेबीकॉर्न यांचे उत्पादन ते घेतात 


सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अमेरिकन ब्रोकोली, रेड कॅबेज, हेलो झुकिनी, रेड झुकिनी, शलगम, रेड कॅबेज, रेड रेडिश, लेट्युस अशा २५ प्रकारच्या विदेशी भाजीपाल्याची लागवड ते करतात.


 स्वतः करतात रोपांची निर्मिती





 बियाणे ऑनलाईन पद्धतीने बोलून स्वतः त्याच्यापासून रोप तयार करतात त्यामुळे त्यांच्या खर्चात बचत होते कारण रोप बाजारात विकत घेतल्यास खूप खर्च येतो.


 स्वतः बाजारात बसून खातात विक्री 


मॉलमध्ये  मिळणारा विदेशी भाजीपाला बुलढाणा सारख्या लहान शहरात विकण्याचे आव्हान विष्णू भाऊंनी त्यांच्या खास मार्केटिंगच्या शैलीने पेलले.

     स्वतः विक्री केल्यामुळे मध्यस्थाला जाणारा पैसा वाचतो व सर्व नफा त्यांना मिळतो.


 अशा या पदवीला शेतकऱ्याकडून प्रेरणा घेत संकटावर मात करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आपली प्रगती करावी असे आवाहन आम्ही कृषिरत्न परिवारातर्फे करतो जय जवान जय किसान ……..धन्यवाद


लेखक

महेश देवानंद गडाख

Msc ( Agri)

MPKV Rahuri



3/Post a Comment/Comments

Post a Comment