महाराष्ट्रात हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे अशा या प्रमुख पिकास रोगाची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण या लेखाच्या माध्यमातून हरभरा पिकातील मर रोग व तांबेरा रोग यांची लक्षणे व व्यवस्थापन कसे करावे हे बघणार आहोत
मर रोगाची लक्षणे व त्याचे व्यवस्थापन
मर रोगाची लक्षणे:-
मर रोग हा हरभरा पिकातील महत्त्वाचा रोग आहे जर हरभरा पिकामध्ये मर रोग पडल्यास साधारणपणे खालील लक्षणे हरभरा पिकावर आढळून येतात
१)झाड पिवळसर पडणे
२)झाड अकाली वाळणे
३)झाड उपटल्यानंतर मुळे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसणे.
४) मुळ्या कुजलेल्या आढळून येणे.
५) कुजलेल्या मुळ्या तपकिरी दिसणे.
यांसारखी लक्षणे जर आपल्या पिकांमध्ये आढळली तर आपल्या पिकास मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.
मर रोगाचे व्यवस्थापन:-
वेळीच जर मर रोगाचे व्यवस्थापन केले नाही तर हरभरा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते म्हणून शेतकरी बंधूंनी मर रोगाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे.
१)रोगांचा प्रादुर्भाव करणारी बुरशी जमिनीत वाढते त्यामुळे जमीन नांगरावी व चांगली तापू द्यावी असे केल्यामुळे बुरशीची वाढ थांबते.
२) मर रोगाच्या व्यवस्थापनाकरिता पीक फेरपालट करणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे.
३) आंतरपीक घेतल्यास मर रोगाच्या व्यवस्थापनात फायदा होतो.
४) मर रोगाच्या व्यवस्थापनात बीजप्रक्रियेस अनन्यसाधारण महत्त्व आहे, बियाण्यास थायरम किंवा ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी.
५) रोगप्रतिबंधक वाणाची लागवड करावी.
६) पीक लागवडीनंतर जास्त प्रमाणात पाणी दिल्यास शेतात बुरशीची वाढ होते त्यामुळे योग्य प्रमाणातच पाणी द्यावे.
तांबेरा रोग लक्षणे व व्यवस्थापन
तांबेरा रोग लक्षणे:-
मर रोग प्रमाणेच तांबेरा हा हरभरा पिकातील प्रमुख रोग आहे. हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव असल्यास खालील लक्षणे दिसतात.
१) पानांच्या दोन्ही बाजू तपकिरी पडणे
२)पाणे पिवळसर होणे व गळून पडणे
तांबेरा रोगाचे व्यवस्थापन :-
योग्य वेळी तांबेरा रोगाचे व्यवस्थापन न केल्यास घाटे भरण्याच्या अवस्थेत जास्त नुकसान होते व उत्पादनात घट होते त्यामुळे शेतकरी बंधूंनी तांबेरा रोगाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. तांबेरा रोगाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे.
१) रोगप्रतिकारक वानांची लागवड करावी.
२) तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनात बीजप्रक्रिया खूप महत्त्व आहे, हरभरा बियाण्यास पेरणीपूर्वी २५ ते ३० ग्रॅम थायरम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.
३) पीक फुलोरा अवस्थेत असताना २५ ग्रॅम गंधक १० लिटर पाण्यात घेउन फवारणी करावी व नंतर चा फवारा डायथेन एम-45 बुरशीनाशकाचा घ्यावा.
हरभरा पिकातील मर रोग व तांबेरा रोग हे महत्त्वाचे रोग असून वेळीच नियंत्रणात आणले नाही तर मोठे नुकसान शेतकरी बांधवांना होऊ शकते हे नुकसान होऊ नये म्हणून वर सांगितलेल्या उपाययोजना कराव्या व हा लेख शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोचवावा…… जय जवान जय किसान
महेश देवानंद गडाख
Msc ( Agri)
MPKV Rahuri


शेतकरी जनहितार्थ
ReplyDeletePost a Comment