शेती हा खूप कष्टाचा तसेच जोखमीचा व्यवसाय आहे असे म्हणले जाते सतत काही ना काही अडचणी शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतात मुला-मुलींचे शिक्षण, लग्न ,दसरा-दिवाळी, दवाखाना शेतीच्या भरवशावर करावा लागतो . सर्व कुटुंबाची जबाबदारी असलेल्या शेतकऱ्याचा शेती करताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाचे काय हाल होत असतील त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करता सन २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली व शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याचे काम सरकारने दिले.
ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची पात्रता
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील वहिती धारक खातेदार म्हणून नोंद असलेल्या कोणत्याही एक वारसदार
वारसदाराच्या व्याख्येत कुटुंबातील हे सदस्य आहेत सामाविष्ट
१)अपघातग्रस्त शेतकऱ्याची पत्नी
२)अपघातग्रस्त शेतकरी स्त्रीचा पती
३) अपघातग्रस्त शेतकऱ्याची अविवाहित मुलगी
४) अपघातग्रस्त शेतकऱ्याची आई
५)अपघातग्रस्त शेतकऱ्याची मुले
६) अपघातग्रस्त शेतकऱ्याची नातवंडे
७) अपघातग्रस्त शेतकऱ्याची विवाहित मुलगी
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१) अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे नाव समाविष्ट असलेल्या ७/१२ किंवा ८ -अ नमुन्याचे उतारा
२) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव ७/१२ वर
आली असेल अशी संबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६ ड)
३)शेतकऱ्यांची वारस म्हणून गाव कामगार तलाठी कडील गाव नमुना नंबर ६ नुसार मंजूर झालेली नोंद
४) अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत समाविष्ट बाबी
१)रस्ता रेल्वे अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व येणे
२)शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होणे.
३)जंतुनाशके हाताळतांना किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे विषबाधा होऊ नये.
४)विजेचा धक्का बसून अपघात होणे.
६) वीज पडल्याने मृत्यू होणे होणे.
७)विजेचा धक्का बसून अपघात होणे.
८)वीज पडल्याने मृत्यू होणे होणे.
९)खून होणे.
१०)उंचावरून पडून अपघात होणे.
११)सर्पदंश किंवा विंचू दंश होणे.
१२)नक्षलवाद्यांकडून शेतकऱ्याची हत्या होणे.
१३)जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखम होणे किंवा मृत्यू होणे.
१४) दंगली मध्ये जखमी होणे किंवा मृत्यू होणे.
१५)अन्य कोणताही अपघात
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या बाबी
१)शेतकऱ्यांचा नैसर्गिक मृत्युने विमा कालावधी पूर्वीच अपंगत्व येणे.
२) आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या करणे किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे.
३) खुनाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना अपघात होणे.
४)अंमली पदार्थांच्या नशेत असताना झालेला अपघात.
५)भ्रमिष्टपणा
६)स्त्री शेतकऱ्याचा बाळंतपणात मृत्यू होणे.
७) शरीरांतर्गत रक्तस्त्राव होणे.
८) शेतकऱ्यांचा मोटार शर्यतीत झालेला अपघात.
९) युद्ध, सैन्यातील नोकरी.
१०)जवळच्या लाभधारकांनी खून केल्यास
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये
१)शासन या सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरत असते, शेतकऱ्यांना स्वतः किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेला या योजनेत विमा हप्ता भरण्याची गरज नाही.
२)शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने शेतकऱ्यांचा वेगळा विमा उतरवला असल्यास त्याचा आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा काही संबंध राहणार नाही व त्यांचे लाभही स्वतंत्र असतील.
३)योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील कागदपत्रांची पूर्तता केल्यास इतर कोणताही कागदपत्रे सादर करावी लागणार नाही
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी पात्र झाल्यास खालील लाभ मिळतात
१)शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळते.
२)दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळते.
३)अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.
४) अपघातात डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा अर्ज कोठे सादर करावा
शेतकरी किंवा शेतकर्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा
Post a Comment