शेतकरी बंधूंनो जाणून घ्या हे आहेत बीजप्रक्रिया करण्याचे फायदे
१)बियाण्यास बुरशीजन्य रोगापासून वाचण्यात बीजप्रक्रिया महत्त्वाची ठरते.
२) बीजप्रक्रिया केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
३)बियाण्याची उगवण क्षमता बीजप्रक्रियेमुळे वाढते असे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
४)बीजप्रक्रिया केल्यास रोग व कीड नियंत्रणात आणणे शक्य होते.
५)पीकसंरक्षण यावर होणारा खर्च कमी होण्यास मदत होते.
६)उत्पादनात वाढ होते.
७) रायझोबियम या जिवाणूंची बीजप्रक्रिया केल्यास पिकास नत्र कमी प्रमाणात द्यावे लागते कारण रायझोबियमच्या मदतीने पीक हवेतील नत्र शोषून घेते.
९)स्पुरद विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर बीजप्रक्रिया केल्यास लवकर विरघळतो व पिकास उपलब्ध होतो त्यामुळे उत्पादनात वाढ होणे
१०) ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर प्रक्रियेमध्ये केल्यास बुरशीजन्य रोगांपासून होणारे नुकसान टाळता येते
संकलक
प्रा. महेश देवानंद गडाख
Msc ( Agri)
MPKV Rahuri

Post a Comment