कपाशी महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक असून हे तंतू पिकातील सर्वात महत्त्वाचे पिक आहे. महाराष्ट्रातील कपाशी उत्पादक क्षेत्रात विचार करता महाराष्ट्रात देशाच्या क्षेत्रापैकी १/३ क्षेत्र म्हणजे ३० लाख हेक्टर क्षेत्र कपाशी खाली आहे महाराष्ट्राचा देशात कपाशी क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील एकूण कपाशी उत्पादक क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र हे विदर्भात आहे.
अशा या महत्त्वाच्या पिकावर कित्येक शेतकरी अवलंबून आहेत. दिवसेंदिवस गुलाबी बोंडआळी च्या प्रादुर्भावामुळे कापशीचे उत्पादन घटत चालले आहे याचे एक प्रमुख कारण म्हणजे "कपाशीचे फरदड घेणे" तर या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत फरदड ?
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ फरदड म्हणजे काय?
फरदड म्हणजे कपाशीची वेचणी पूर्ण झाल्यानंतर सिंचनाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी परत त्याच कपाशीला पाणी, खते कीटकनाशकांचा वापर करून पीक घेतले जाते आणि त्यापासून जो कापूस मिळतो त्याला परदड कापूस असे म्हटले जाते .
शेतकरी बंधूंनो आता आपण जाणून घेऊया पदर का घेऊ नये ?
आपण जर फरदड घेतली तर गुलाबी बोंड आळीला वाढण्यासाठी सतत खाद्य उपलब्ध होते व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागतो व हि गुलाबी बोंड अळी पुढील वर्षीच्या कापसाला खूप नुकसान कारक ठरते.
फरदड घेतली नाही तर?
फरदड घेतली नाहीतर गुलाबी बोंड आळीला खाण्यासाठी खाद्य उपलब्ध होत नाही त्यामुळे गुलाबी बोंड आळी चा जीवनक्रम संपुष्टात येतो व परिणामी कपाशीच्या पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो उत्पादनात वाढ दिसून येते हे सर्व उत्पन्न घेण्याचे फायदे जाणून शेतकरी बांधवांना विनंती करतो की फरदड घेऊ नये
धन्यवाद शेतकरी मंडळी कृषिसल्ला बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा…
संकलक
प्रा. महेश देवानंद गडाख
Msc ( Agri)
MPKV Rahuri
Post a Comment