आज आपण या लेखामध्ये वाढलेला
उत्पादन खर्च: शेती सोमोरील आव्हान
याबद्दल माहिती बघणार आहोत यामध्ये आपल्याला डॉ.अनंत इंगळे सरांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
वाढलेला उत्पादन खर्च: शेती सोमोरील
आव्हान
Ø गेल्या दशकात कृषी क्षेत्रात झालेला बदल आणि बदललले
सामाजिक जीवन याचा आजच्या शेतीवर खूप मोठा परिणाम झाला आहे, मागील २ वर्षे कोरोनाच्या
संसर्गामुळे / लॉकडाऊनमुळे बरेच शहरी लोक खेड्याकडे आले व त्यांना त्या काळात
शेतीने जवळ केले.
Ø दुसरे म्हणजे सर्व गोष्टी याच काळात बंद होत्या परंतु
फक्त एक कृषी व्यवसाय सुरू होता आणि याच काळात लोकांचे डोळे उघडले की शेती शिवाय
मजा नाही, शेतीत आपण काहीही करू शकतो.
Ø याच धर्तीवर
२०२१-२०२२ चा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने शेती क्षेत्राला एक नवीन दिशा
देणारे हे २ वर्ष ठरले, कारण यव्हढे नवीन प्रयोग शेतीमध्ये मागील २ वर्षात झाले , नवीन तंत्रज्ञान/ नवीन वाण /
नवीन गोष्टी तसेच नवीन शेतकरी म्हणजे शिकलले लोक सुध्दा शेतीमध्ये लक्ष देऊ लागले
त्यामुळे शेतीचा विकास तर होत आहेच परंतु त्यावर होणारा खर्च मात्र खूप मोठ्या
प्रमाणावर वाढला आहे आणि पाहिजेत तेव्हढे हमी भाव शेतमालाला मिळत नाहीत.
Ø वाढलेला उत्पादन खर्च हे शेती/ शेतकरी यांच्या समोरील एक
मोठे आव्हान आहे, ते कसे कमी करता येईल व कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल
यावर बोलणे आवश्यक आहे.
Ø शेतीचे उत्पादन
तर वाढले आहे परंतु खर्च सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे त्यातून
मिळणारा आर्थिक लाभ हा अतिशय नगण्य आहे आणि त्यामुळेच शेतकरी जिथे होता तिथेच आहे.
Ø उत्पादन वाढवण्याच्या इर्षेपोटी अतोणात खर्च केला जातो व
त्यात आर्थिक मिळकत मिळत नाही फक्त सांगायला होते इतके उत्पादन झाले तितके झाले
परंतु पैसे किती आले इत्यादी......विचार करण्यासारखे आहे
Ø त्याच गोष्टीचा विचार करून आज याठिकाणी शेतीवरील खर्च
कसा वाढला आहे व तो कमी कसा करता येईल हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्पादन खर्च वाढण्याची कारणे
Ø वाढती महागाई/ मजुरी
Ø मजुरांची उलब्धता
Ø वाढलेले खत व औषध यांचे दर
Ø बदलते हवामान / अनिश्चित वातावरण
Ø नैसर्गीक गोष्टी : शेणखत / गांडूळखत यांची उपलब्धता (
मिळत नाही)
Ø अयोग्य नियोजन/ व्यवस्थापन
Ø रोग/ कीड व्यवस्थापन किंवा खत यांचा वापर
Ø तसेच या सर्व गोष्टीसाठी दुकानदार / कंपनी प्रतिनिधी
यांचेवर अवलंबून असलेले शेतकरी
Ø शेतीचा खर्च व उत्पन्न यांचे गणित व नियोजन यांचा अभाव
Ø अयोग्य मार्गदर्शन व सल्ले (हल्ली कोणीही शेती विषयक
सल्ले देत आहेत त्यात शेतकरी भरडला जातो)
Ø वाढलेली महगाई पण त्या तुलनेत असलेले हमी भाव कमी आहेत
Ø शेतमालाची काढणीपश्चात अयोग्य नीयोजन / नासाडी
Ø शेतकरी व त्याच्या घरातील लोक यांचा शेती मद्ये असेलला
सहभाग ( काहीच शेतकरी वर्गाला लागू पडते)
Ø एकाच पिकाची/ वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते
Ø जमीनीची खालावलेली पोत / कमी झालेले सेंद्रिय कर्ब /
तसेच अयोग्य व असमतोल रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच तणनाशक
यांचा वाढलेला वापर.
Ø गरज नसतांना महागडी व भारी कीटकनाशक व बुरशी नाशक यांचा
वापर
Ø गरज नसतांना खते / सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा अतोनात
वापर
वाढलेला खर्च कमी कसा करता येईल
Ø मजुरांवर असलेले शेतीचे अवलंबन कमी करत वेगवेगळी पिक
पद्धती / वेगवेगळ्या नवीन वाणांचा वापर केला तर आपले शेतीतील कामे एकाच वेळी
येणार नाहीत व त्यामुळे आपल्याला एकच वेळी
मजूर लागणार नाही.
Ø आपल्याकडे असलेल्या एकूण शेतीपैकी ठराविक एकर वर आपले एक " क्रॉप
मॉडेल " असायला हवे ज्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल ( समजा ५ एकर शेती
असेल तर एक एकर वर आपले क्रॉप मॉडेल हवे ज्यातून आपल्याला हमी उत्पन्न मिळेल )
Ø शेणखत / गांडूळ खत / जिवमृत अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर
केला तर आपला खर्च नक्कीच वाचेल
Ø कंपोस्ट खताचा वापर तसेच जमीनीची पोत सुधारण्यासाठी
प्रयत्न करणे आवश्यक आहे, शेतातील गवत व कचरा यापासून कंपोस्ट खत बनवून त्याचा वापर
Ø सुरवातीपासून योग्य नियोजन step by step व्यवस्थापन, शास्त्रोक्त पद्धतीने वेळीच व मूळ व्यवस्थापन,
Ø सुरवातीलाच महागडे / भारी कीटनाशकांचा व बुरशी नाशक
यांचा वापर करणे टाळणे, साधे व स्वस्थ कीटकनाशके तसेच एकात्मिक व्यस्थापन करणे
Ø माती परीक्षण करून खत व्यवस्थापन गरज असेल तेवढेच देणे
आवश्यक आहे ( एकात्मिक अन्नद्रव्य
व्यवस्थापन)
Ø नैसर्गिक गोष्टींचा वापर पक्षी थांबे/ निंबोळी अर्क /
व्हर्मिवाश / हिरवळीची पिके यांचा वापर
करणे आवश्यक आहे
Ø शेतकरी मित्रांनी पिकानिहाय खर्च व उत्पन्न यांचे गणित
काढणे आवश्यक आहे ( लागणारा खर्च हा होणाऱ्या उत्पादनावर आधारित असावा )
Ø जमीनीचा प्रकार व हवामान यांचा अभ्यास करून खर्च करावा ( हलकी जमीन असेल तर
नक्कीच उत्पादन कमी येते त्यामुळे तिथे खर्च जास्त करू नये )
Ø खर्च करत असताना आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन किती मिळेल
याचा अंदाज घेऊनच खर्च करावा ( कारण तुमची जमीन व हवामान यानुसार प्रतेक भागात
किती उत्पादन येते याचा अंदाज असतोच त्यामुळे उगाच जास्तीचा खर्च करू नये )
Ø एकाच पिकावर किंवा पिकाच्या एकाच वाणाची लागवड न करता
पीक विविधता व जमीनीचा प्रकार व काढणीचा कालावधी नुसार वेगवेगळ्या २-३ वाणांची
निवड करावी
Ø शेतीतील कामे जास्तीत जास्त घरी कसे करता येतील याकडे
लक्ष देणे गरजेचे आहे
Ø किटकनाशक व बुरशीनाशक यासाठी दुकानदार किंवा कंपनी
प्रतिनिधी यांवर अवलंबून न राहता स्वतः त्याचा अभ्यास करून मागील वर्षीचे अनुभव
तसेच शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे ( एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन यांचा
अवलंब करावा ) फवारणी मद्ये कमीत कमी ८ दिवसांचे तरी अंतर ठेवावे
Ø आपल्याला लागणारी खते / बियाणे / कीटकनाशके/ बुरशीनाशके
नगदी/ रोख पद्धतीने खरेदी करण्याचा अवलंब करावा उधारी करत असाल तर त्यात तुमचेच
नुकसान आहे ( हा विषय खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही उधार घेत असाल तर समोरील
दुकानदार तुम्हाला पर्याय नाही देऊ शकत व भाव कमी नाही लावू शकत त्यामुळे तुम्ही
रोख खरेदी केली तर तुम्हाला पर्याय मिळेल व भाव सुध्दा कमी राहील त्यात तुमचा खर्च
वाचेल )
Ø सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतांना कमीत कमी ७-८
दिवसांचा फरक ठेवा व जास्तीत जास्त ३-५ किलो इतकेच प्रमाण वापरा ( काही शेतकरी २-३
दिवसांनी १० किलो सोडतात ते तुम्ही खत
नाहितर पैसे सोडत आहात आणि ते सुद्धा काहीच गरज नसतांना )
Ø एकरी झाडांची संख्या योग्य राखणे व बीज प्रक्रिया करून/
योग्य अंतर याप्रमाणेच पेरणी करा
Ø माती व जमीनीची जोपर्यंत पोत सुधारण्यासाठी तुम्ही
प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत तुमचा खर्च कमी होणार नाही त्यामुळे जमिनीचे आरोग्य
याकडे लक्ष देणे आवश्यक आहे
Ø अनुभवी शेतकरी / शास्त्रज्ञ / कृषी तज्ञ यांचे
मार्गदर्शन घ्या त्याप्रमाणे करा व वेळेत करा ( शेती हा असा व्यवसाय आहे त्यात
वेळेला खूप महत्व आहे, वेळेत काम पूर्ण नाही झाले तर खूप मोठे नुकसान होते व त्यासाठी खूप
पैसा मोजावा लागतो )
Ø शेतकरी मित्रांनी पिकणीहाय खर्च व उत्पन्न यांचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे व आपल्या उत्पन्नात दरवर्षी वाढ कसी होईल
त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे व शेतीला एक व्यवसायिक दृषटिकोन देणे आवश्यक आहे तसेच शेतकरी मित्रांनी ग्रुप शेती करणे आवश्यक आहे.
( काही शेतकरी बऱ्याच प्रतिनिधी
चे schedule घेतात त्यात मी बघितले तर दर २-३ दिवसांनी Drenching किंवा
फवारणी दिलेली दिसते आणि असे जर आपण करत असाल तर नक्कीच आपला खर्च वाढणार आहे
त्यामुळे गरज बघून नियोजन करावे उगाच गरज नसताना खत आणि फवारणी दिली तर आपण आपला
खर्च वाढवत आहात हे लक्षात ठेवा )
वरील सर्व माहिती व गोष्टींचा विचार करून आपण येणाऱ्या
पुढील हंगामात आपला होणारा जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा
.
धन्यवाद
डॉ.अनंत उत्त्तमराव इंगळे
- Ph.D Genetics and Plant Breeding MPKV, Rahuri
- संशोधन सहाय्यक कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विध्यापीठ राहुरी
- संचालक विदर्भ शेती विकास संस्था , चिखली ( बुलढाणा )
संपादन
प्रा. महेश देवानंदराव गडाख
- M.Sc (Agri ) in Agronomy MPKV, Rahuri
- सहाय्यक प्राध्यापक विवेकानंद कृषी महाविद्यालय ,हिवरा आश्रम
- सहसंचालक विदर्भ शेती विकास संस्था , चिखली ( बुलढाणा )


Post a Comment