हरबरा पिकातील मर रोग लक्षणे व उपाययोजना

 

कृषिरत्न शेतकरी समूहामार्फत शेतकरी वर्गासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती पत्रिका पुरविण्यात येत असते .

      यामध्ये विविध पिकाबद्दल लागवडीविषयी माहिती , कीड व्यवस्थापन , रोग व्यवस्थापन , खत व्यवस्थापन , तण व्यवस्थापन ,  कृषी पूरक व्यवसाय , कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी  याविषयी खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.

      आज आपण या लेखामध्ये हरभरा पिकातील मर रोग याबद्दल माहिती बघणार आहोत यामध्ये  आपल्याला डॉ.अनंत इंगळे सरांचे मार्गदर्शन  लाभणार आहे .


हरबरा पिकातील मर रोग लक्षणे व उपाययोजना

                    हरभरा हे रब्बी  हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी  होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग ,त्यातील एक प्रमुख रोग म्हणजे मर रोग त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर रोगचे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे.

मर रोग

- मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो.

- या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाण्यामार्फत होतो.

-  हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो.

- मर रोगाची बुरशी अनेक वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते.

 - ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे प्रार्दुभाव कमी आढळतो 

लक्षणे

-         झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.

-         कोवळी रोप सुकतात.

-         जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.

-          रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.

                

             

 






मर रोग प्रादुर्भावाची कारणे ( 2022 )

                    यावर्षी हरबरा पेरणी उशिरा झाली त्याच बरोबर, ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे हरबरा पिकावर त्याचा परिणाम होतो आहे, वाढ जरा कमी झाली आहे , तसेच बऱ्याच ठिकाणी मर रोग व कॉलर रॉट चा प्रादुर्भाव दिसून येत आहे,

                    मुख्य कारण म्हणजे गेल्या हंगामात सोयाबीन हे पीक होते व शेवटी पाऊस झाला त्यामुळे जमिनीमध्ये ओल ( moisture ) जास्त होती त्यामुळे, पाहिजेत असे जमिनीची मशागत झाली नाही किंवा सोयाबीन मधे असणारा कॉलर रॉट ची बुरशी (Expose) झाली नाही, प्रामुख्याने Sclerotium rolfsii ( Collor rot) सोयाबीन मधे शेवटी येतो व तेव्हडा एक्स्प्रेस होत नाही आणि सोयाबीन काढणीला आलेली असेत त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही व तेच fungus जमिनीमध्ये राहते व हरबरा पिकाच्या सुरवातीला एक्स्प्रेस होते व आपल्याला हरबरा जळत आहे किंवा मरत आहे असे दिसते.

                    हरबरा पिकामध्ये सुधा तो जेव्हा ढगाळ हवामान व पाऊस किंवा ओली जमीन असेल तर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो , जर हवामान चांगले असते, थंडी पडली असती तर इतक्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नसता.

                    या वर्षी चे रब्बी हंगामात हवामान पोषक आहे परंतु ढगाळ वातावरण किंवा जमिनीतील अती जास्त ओलावा या कारणाने आपल्याला हरबरा पिकामध्ये मर व कॉलर रॉट सारखे रोग दिसून येत आहेत.

                    त्यासाठी शेतकरी मित्रांनी Trichoderma viridi चे ४-५ किलो किंवा लिटर एकरी ड्रेचींग करणे आवश्यक आहे किंवा गांडूळ खता सोबत मिक्स करून टाकू शकता.

रासायनिक बुरशी नाशकामध्ये

- Copper Oxychloride ३०० gm किंवा

- Fosetyle Alluminium ३०० gm किंवा

- Metalaxyl + Mancozeb ४०० gm किंवा

- Chlorothalonil+ Metalaxyl   २५० मिली किंवा

- Carbendazim + Mancozeb ( Sprint) ५०० gm

यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आणि सोबत

Thiamethoxum ३० FS किंवा

Chloropyriphos ५० EC घेऊन drenching करावी ( drenching तुम्ही स्प्रिंकलर द्वारे करू शकता )

                    जर जमीन ओली असेल तर वरील बुरशीनाशक व कीटकनाशक यांची फवारणी सुद्धा करू शकता, परंतु फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळी करावी व जमिनीमध्ये हरबरा पिकाच्या मुळी पर्यंत औषध  जाईल याची काळजी घ्यावी.

                    तसेच जर आपले शेत ओले असेल तर कोळपणी व खुरपणी करावी जेणेकरून जमिनीमध्ये हवा खेळती राहील व ओलावा कमी झाला की बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल.

Ø पहिल्या फवारणी मधे

१२:६१:०० १०० gm + Micronutrient २५ gm वापर केला तर चांगला फायदा होऊ शकतो तसेच

Ø दुसऱ्या फवारणी मधे

-         Thiophanate methyle  किंवा

-         Tebucanazole+ Sulfur  किंवा

-         Propicanazole+ Trycyclazole किंवा

-          Propicanazole or Hexacanazole

यापैकी एक

सोबत

-          Emamectin benzoat किंवा

-         Emamectin benzoat+ Novaluaron किंवा

-         Profenophos+ Cypermethrin किंवा

-         Chlorantraniprole किंवा

-         Chlorothalonil+ Lambdacyhlothrin

यापैकी एक आणि ०:५२:३४ १०० gm

 

                    याप्रमाणे उपाययोजना  केली तर रोग व कीड व्यवस्थापनसाठी मदत होईल उत्पादन चांगले मिळेल.लेख कसा वाटलं नक्की कळवा सोबतच अजून कोणत्या विषयावर आपल्याला माहिती हवी आहे तेहि कळवा.

                    असेच महत्वपूर्ण लेख घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणार आहोत यामध्ये तुमची साथ आमच्यासाठी खूप महत्वाची आहे………धन्यवाद

 लेखक परिचय

डॉ.अनंत उत्त्तमराव इंगळे

Ph.D Genetics and Plant Breeding MPKV, Rahuri 

संशोधन सहाय्यक कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विध्यापीठ राहुरी

संचालक विदर्भ शेती विकास संस्था चिखली ( बुलढाणा )

               

प्रा. महेश देवानंदराव गडाख    

- M.Sc (Agri ) in Agronomy MPKV, Rahuri 

सहाय्यक प्राध्यापक विवेकानंद कृषी महाविद्यालय ,हिवरा आश्रम  

सहसंचालक विदर्भ शेती विकास संस्था चिखली ( बुलढाणा )

0/Post a Comment/Comments