👉🏻2020 कांदा बियाणे भाव 4000 रुपये किलो पर्यंत गेले होते, याच कारणाने विदर्भ व मराठवाडा भागातील शेतकरी मीत्रांनी विविध कंपनी असतील किवा वयक्तिक पातळीवर कांदा बियाणे ऊत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे..
👉🏻 वातवरण व इतर कारणे यामुळे कांदा पिकावर मर रोग, करपा व इतर रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत..बरेच शेतकरी कॉल करत आहेत अणि मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे परेषान आहेत, त्यांचेसाठी आजचा लेख...✍🏻
मर रोगाची प्रमुख कारणे
👉🏻 लागवडीसाठी निवडलेला अयोग्य कांदा ( bulb),
👉🏻 लावताना बुरशीनाशक व कीटकनाशक यांची बीज प्रक्रीया न करणे.
👉🏻सततचे ढगाळ वातावरण व धुके
👉🏻जमीनीमध्ये जास्त ओलावा किवा पाण्याची कमतरता
👉🏻खतांची अयोग्य मात्रा व अयोग्य वेळी देणे..
👉🏻 थ्रिप्स व इतर रस शोषण करणारे कीटक
👆🏻अशी वेगवेगळी कारणे कांदा पिकची बियाणे ऊत्पादनामधे अडथळे निर्माण करतात..
योग्य व वेळीच नियंत्रण
👉🏻लागवडीसाठी योग्य कांदे निवड करणे गरजेचे आहे @ परंतू लागवड झाली आहे त्यामूळे आता आपल्या शेतामधे ज्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आहे ते झाडे कमी प्रमाणात असतिल तर् लगेच उपटून नष्ट करणे..
👉🏻 कोळप्यची पाळी देणे शक्य असेल तर पाळी देऊन पाणी देणे व खताची योग्य मात्रा देणे 2:1:1 NPK याप्रमणात 100 किलो नत्र 50 किलो स्पूरद 50 किलो पालाश (Urea + DAP +Potash किंवा Urea + 10:26:26 )
👉🏻 सोबतच micronutrient देणे गरजेचे आहे (boron, copper, zinc, ferus)
👉🏻मर रोगाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी
Fosetyl aluminum 100gm/ acer + Streptomycin 20 gm / acer + Thiamethoxam 80gm/ acer किवा
Copper oxychloride 250 gm / acer + Streptomycin 20 gm / acer + Thaimethoxm 80/ acer
👆🏻 याप्रमाणे ड्रेंचींग करावे तसेच Trichoderma (4 kg / acer) किंवा biofungicide चा वापर केला तरी चालेल.
👉🏻वेळीच फवारनी करणे गरजेचे आहे @ Thiophanate methyle 25 gm per pump किवा Fosetyl aluminum 20 gm per pump किवा Metalaxyl +Mancozeb 25 gm per pump
सोबत Thaimethoxm +lambdacylothrine किंवा Thaimethoxm 8 gm per pump
त्यंनातर 10 ते 15 दिवसांनी
Azoxystrobin +difenocanazol ( 200ml/acer) + (imidacloprid + fipronil 100gm / acer ) सोबत
Micronutrient grade II and 19:19:19
याप्रमाणे करावी 👍🏻असे केल्यास नियंत्रण मिळेल..
उत्कृष्ट बीज उत्पादनासाठी महत्त्वाचे मुद्दे
👉🏻 व्यवस्थीत व योग्य वेळी खत व्यवस्थापन, योग्य डोस ( Urea + DAP + Potash किवा urea + 10:26:26)
👉🏻 योग्य सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन
Boron ,zinc , ferus ,copper देणे आवश्यक
👉🏻 योग्य वेळी रोग नियंत्रण @ वरिल प्रमाणे ड्रेंचींग व फवारनी योग्य वेळी करावी @ लागवडी नंतर 15- 20 दिवसानी पहिली फवारनी व त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी करावी
👉🏻 कांदा बीज ऊत्पादनात मधमाशी महत्त्वाचं काम करते ते म्हणजे परागीकरण 🐝🐝🐝🦟 त्यामूळे शेतामध्ये मधमाशी संख्या वाढली पाहिजेत त्यासाठी @ फुलांची झाडे कडेला व मध्ये लावावीत मोहरी,kenaf , rosel, hemp ,सूर्यफूल इत्यादि..
👉🏻फुलोरा अवस्थेत कुठलेही रासायनीक कीटकनाशक फवारु नये, त्या साठी जैविक किवा बायो पेस्टीसाईड वापरावे..
👉🏻 फुलोरा अवस्थेत मधमाशी तसेच इतर किटक याना आकर्षक असतिल असे द्रवे फवारले तरी चालेल..
👉🏻शेवटचा खताचा डोस देताना Boron व Zinc दयावे त्यामूळे germination मधे वाढ होते व उच्च प्रतीचे बियाणे आपल्याला मिळते..
कांदा बीज उत्पादनामधे अडचण असल्यास कॉल करु शकता किवा msg करू शकता
धन्यावाद 🌱🌱🙏🏻🙏🏻
डॉ. अनंत उत्तमराव इंगळे
9689653854
Gangai Agro Clinic
मर रोग # कारणे # नियंत्रण #उच्च प्रतीचे बियाणे उत्पादन.. #कृषिरत्नब्लॉग# #Krishiratna
🙏👍
ReplyDeletePost a Comment