![]() |
कृषिरत्न या शेतीविषयक ब्लॉगमध्ये सर्व शेतकरी बंधूंचेेे हार्दिक स्वागत आज आपण हरभरा पिकातील घाटी आळीचे व्यवस्थापन बघणार आहोत...
महाराष्ट्रातील रब्बी हंगामात घेतले जाणारे प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकाचे किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, यामध्ये प्रामुख्याने सर्वात नुकसानकारक किड म्हणजे घाटे अळी .
तर या लेखाच्या माध्यमातून आपण आज घाटे अळीच्या व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी सर्वांनी ही माहिती वाचावी व इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोचवली.
घाटेआळीची ओळख
कोणत्याही किडीचे व्यवस्थापन करायचे असेल तर ती कीड आपल्याला ओळखता आली पाहिजे.
घाटे आळीची ओळख साधारणपणे पुढील प्रमाणे करता येईल
-आळीचा रंग पिवळा किंवा बदामी असतो.
- पुढचे पंख तपकिरी असतात व त्या पंखावर काळा ठिपका असतो.
- तर मागच्या पंखावर धुरकट कडा आढळून येतात.
-अळीचा रंग हिरवा हिरवट असतो
घाटेअळीचा जीवनक्रम
-घाटे अळीचा मादी पतंग कोवळ्या पानांवर, फुलांवर, कळ्यांवर, अंडी घालते.
- ६ ते ७ दिवस अंड्यातून अळी बाहेर येण्यास लागतात.
- १४ ते १५ दिवसात अळीची वाढ पूर्ण होते व त्यानंतर अळी कोषावस्थेत जाते.
- त्यानंतर काही दिवसात पतंग बाहेर येतात.
असा घाटेअळीचा जीवन क्रम सतत चालू असतो एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात म्हणून ही एक आपल्या पिकास घातक कीड आहे त्यामुळे घाटी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
अशा पद्धतीने करा घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी असे केल्यामुळे जमिनीत घाटे अळीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होते.
- पिक फेरपालट करणे हासुद्धा एक उपाय नियंत्रणासाठी वापरतात.
- पेरणी योग्य वेळेतच करावी पेरणीची योग्य वेळ १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात केल्यास घाटे अळीचे प्रमाण कमी दिसते.
- कीड प्रतिकारक वाणाची लागवड केल्यास फायदा होतो.
- शेतात कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास घाटे अळीच्या नियंत्रण मदत होते.
- शेतात T आकाराचे पक्षीथांबे लावावेत जेणेकरून पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या शोधून खातील.
-घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवल्यास पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची करावी.
- घाटे अळीच्या नियंत्रणासाठी HaNPV चे खूप महत्त्व आहे या विषाणूची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-आवश्यकता भासल्यास लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही१० मिली किंवा क्लोरेट्रिनीप्रोल १८.५ प्रवाही २.५-३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने व्यवस्थापन केले तर निश्चितच घाटेअळीला नियंत्रणात आणता येईल व उत्पादनात वाढ होईल
..जय जवान जय किसान
महेश देवानंद गडाख
Msc( Agri)
MPKV Rahuri
अमोल ज्ञानेश्वर सुराशे
Msc( Agri)
MPKV Rahuri


Very informative for upcoming season
ReplyDeletePost a Comment